दिवा शहरातील शैक्षणिक, राजकीय व उद्योग क्षेत्रातील प्रसिद्ध श्री.नरेशजी पवार यांची भाजप च्या शिक्षण संस्थाचालक प्रकोष्ठ महाराष्ट्र राज्य सहसायोजक पदी नेमणूक…
अमित जाधव - संपादक
ठाणे, दिवा ता २८ जानेवारी : दिवा शहरातील व्यवसायिक व शिक्षणसम्राट म्हणून ओळखले जाणारे भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष नरेश पवार यांची भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश शिक्षण संस्था चालक प्रकोष्टच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शैक्षणिक क्षेत्रातील नावाजलेल्या मेष्टा या संघटनेचे ते ठाणे जिल्हा अध्यक्ष म्हणून नरेश पवार हे जबाबदारी पार पाडत आहेत. प्रसंगी सदर नियुक्तीमुळे शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवराकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून पुढील वाटचालीस शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
जीवनात यश मिळवण्यासाठी उत्तम शिक्षण अत्यंत आवश्यक आहे. तसेच आपल्यामध्ये आत्मविश्वास वाढवण्यासाठी व आपले व्यक्तिमत्व घडवण्यासाठी उच्च शिक्षणच मदत ठरते. शालेय शिक्षण प्रत्येकाच्या जीवनात मोठी भूमिका बजावते. प्राथमिक, माध्यमिक शिक्षण आणि उच्च माध्यमिक शिक्षण अशी संपूर्ण शिक्षण व्यवस्था तीन भागांमध्ये विभागली गेली आहे. शिक्षणाच्या सर्व स्तरांचे स्वतःचे विशेष महत्त्व आणि स्थान आहे. आपल्याला सर्व मुलांना यशाच्या दिशेने जाताना पहावयाचे असल्यास चांगल्या आणि योग्य शिक्षणाद्वारेच शक्य आहे. म्हणूनच सर्वांनी शिकणं अत्यंत गरजेचे आहे असे नरेश पवार यांनी बोलताना स्पष्ट केले आहे. दिवा शहरातील कोणताही मुलगा अथवा मुलगी शिक्षणापासून वंचित राहणार नाही त्यासाठी माझे नेहमी सहकार्य असेल असे प्रतिपादन केले आहे.