ब्रेकिंग
जनविकास फाउंडेशनकडून दिवा शहरात यशस्वी विध्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न..
अमित जाधव - संपादक
ठाणे, दिवा ता १४ जुलै : जनविकास फाउंडेशन दिवा विभाग या संस्थेच्या वतीने रविवार दिनांक १४ जुलै रोजी सायंकाळी दिव्यातील बी आर नगर येथील विश्वकर्मा संकुलात मोठ्या उत्साहात पार पडला. दिवा शहरातील इयत्ता १० वी / १२वी तसेच १५ वी यशस्वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. सर्व यशस्वी व गुणवंत विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन अभिनंदन व कौतुक करण्यात आले.
प्रसंगी जनविकास फाऊंडेशन संस्थेचे अध्यक्ष जयसिंग कांबळे, उपाध्यक्ष अशोक सोलंकी, प्रीती राठोड, सचिव निलेश पाटणे तसेच एकनाथ पाटील, उषा मुंडे, कपिल रोडे, प्रवीण उतेकर, डी के खरात, भावना गुरव, सुशीला राणे, संपत गुंजाळ, संगीता उतेकर, समीर परब यांच्यासह अनेक पदाधिकारी, सदस्य तसेच अनेक विद्यार्थी व पालक मोठया संख्येने उपस्थित होते.