अखेर दिवा शहराला उद्यापासून मिळणार सहा एमएलडी पाणी, दिव्याचे शिवसेनेचे मा.नगरसेवक व पदाधिकारी यांच्या प्रयत्नांना यश…….
अमित जाधव-संपादक
दिवा शहराला होणाऱ्या अपुऱ्या पाणीपुरवठ्यावर तोडगा काढण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आज एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत राज्याचे उद्योग मंत्री मा.ना.श्री.सुभाष देसाई यांच्यासोबत व्हीसीद्वारे सहभागी होऊन या विषयावर चर्चा केली.
#ठाणे महानगरपालिकेअंतर्गत येणाऱ्या दिवा शहराला एमआयडीसीमार्फत होणारा पाणीपुरवठा सुरळीत व्हावा यासाठी सहा एमएलडी पाणी तातडीने देण्याचे निर्देश या बैठकीत देण्यात आले. त्यानुसार उद्यापासून तात्काळ हा पाणीपुरवठा सुरू करण्याचे निर्देश उद्योग मंत्री मा.ना. श्री.सुभाष देसाई यांनी एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना दिले.
डोंबिवली नजीकच्या २७ गावांचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी यांच्यासोबत संयुक्त पाहणी दौरा करून त्यानंतर आपला अहवाल तयार करून शासनाला सादर करण्याचे निर्देश यासमयी दिले.
याप्रसंगी राज्याचे उद्योग मंत्री मा.ना.श्री.सुभाष देसाई व्हीसीद्वारे तर खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विपीन शर्मा, ठाणे महानगरपालिकेचे माजी महापौर नरेश म्हस्के ,दिव्यातील नगरसेवक व पदाधिकारी आणि ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे आणि एमआयडीसी आणि उद्योग विभागाचे सर्व प्रमुख अधिकारी आवर्जून उपस्थित होते.