ठाणे ता १४ सप्टेंबर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार व खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना पक्षाच्या युवासेना विधानसभा समन्वयक पदी करण किणे यांची नियुक्ती करण्यात येत आहे. युवासेना सचिव दिपेश पुंडलिक म्हात्रे यांच्या हस्ते करण किणे यांना नियुक्ती पत्र देऊन सन्मानित करण्यात आले. कळवा व मुंब्रा विभागातील कार्यक्षेत्र विधानसभा हे असून ते पुढे मोठया जोमाने आपली जबाबदारी व शिवसेना पक्ष वाढीस आपले योगदान देऊन सक्रिय कार्यकर्त्यांची व जनतेची कामे पार पाडून सर्वसामान्यांना न्याय देतील असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा ज्वलंत हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची शिकवण आत्मसात करूनं शिवसेना पक्ष वाढीसाठी आपण सर्वाना सोबत घेऊन कार्य कराल असा विश्वास आहे. सदर नियुक्ती तात्पुरत्या स्वरुपातील असून पदाधिकार्याचे काम पाहून कायम करण्यात येतील.असे युवा सेनेचे सचिव दिपेश म्हात्रे यांनी स्पष्ट करत त्यांना पुढील वाटचालीच्या शुभेच्छा देत अभिनंदन केले आहे.