
डोंबिवलीत फेर मतमोजणी होणार
डोंबिवलीतील 10 ईव्हीएम मशिनची पुन्हा फेर मतमोजणी होणार आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार दिपेश म्हात्रे यांनी फेर मतमोजणीची मागणी केली होती, त्यांची मागणी मान्य करत प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. फेर मतमोजणीची रक्कम देखील म्हात्रेनी प्रशासनाकडे जमा केली असून यानंतर प्रशासन त्यांना मोजणीची तारीख आणि वेळ कळवून पुन्हा मतमोजणी केली जाणार आहे, अशी माहिती खुद्द दिपेश म्हात्रेनी दिली आहे.