ब्रेकिंग
नवी मुंबईतील तळोजामध्ये नववी पास युवकाने यूट्यूब व्हिडिओ पाहून बनावट नोटांचा छापखाना केला सुरु,
बनावट नोटांच्या छापखान्यावर कारवाई
नवी मुंबईतील तळोजामध्ये नववी पास युवकाने यूट्यूब व्हिडिओ पाहून बनावट नोटांचा छापखाना सुरु करत लाखो रुपयांच्या नोटा चलनात आणल्याची माहिती समोर आली आहे. याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचत त्याला ताब्यात घेतले. प्रफुल्ल पाटील असे या तरुणाचे नाव आहे. त्याच्याजवळून पोलिसांनी तब्बल दोन लाखांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. यामध्ये 10, 20, 50, 100 आणि 200 रुपयांच्या नोटांचा समावेश आहे.