पुण्यातील किल्ले शिवनेरी गडावर तटबंदीचा कडा तसेच बुरुजही कोसळला आहे. गडाच्या गणेश दरवाजाच्यावरील बाजुचा हा कडा असून तो खाली कोसळला. यामुळे भातखळा तटबंदीचा काही भाग तुटला. त्यामुळे किल्ल्यावर जाताना सावधानता बाळगण्याचे आवाहन पर्यटकांना जुन्नर वनविभागाने केले आहे. दरम्यान, 31 जुलैपर्यंत गडकिल्ल्यांवर जमावबंदीचे आदेश लागू आहेत. याआधी पन्हाळगडाच्या पूर्व तटबंदीतील दगडी शिळा कोसळली होती.