बेधडक ठाणे न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

लाईट नाही ,रत्यात दिवे नाही ,शाळेला गुडघाभर पाण्यातून जावे लागते ,म्हसोबा नगर येथील आंदोलनात सहभागी झालेले चिमुरड्यांचा हृदयद्रावक आवाज….

अमित जाधव - संपादक

ठाणे, दिवा ता 9 जुलै : दिवा शहरातील म्हसोबा देव नगर, लो प्राईज मार्ट, एकविरा आई चाळ, नाना म्हात्रे चाळ, कमलाकर स्मृती बिल्डिंग, एकनाथ धाम बिल्डिंग या ठिकाणी चाळीमध्ये पावसाचे पाणी शिरते तर रस्ता नसल्याने गुडघाभर पाण्यातून जावे लागते व लाईट नसल्याने सर्व परिसर अंधारमय यामुळे रहिवाश्यांनी निवेदन देवून सुद्धा दखल घेत नसल्याने प्रशासनास जाग आणण्यासाठी समाजसेवक अमोल केंद्रे आक्रमक होऊन ठिय्या आंदोलन केले असता प्रसंगी दिवा पोलिस चौकीचे सहायक पोलीस निरीक्षक शहाजी शेळके यांनी स्वतः संपूर्ण परिसराची पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेवून उद्याच कामाला सुरुवात करण्याचे आश्वासन दिले. पोलिस प्रशासनाने केलेल्या मध्यस्थी मुळे नागरिकांनी पोलिस प्रशासनाचे आभार मानले. सदर आंदोलनात अनेक नागरिक,महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.यावेळी धडाकेबाज युवा प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष रामपाल मोरया,ठाणे जिल्हा महिला अध्यक्षा ज्योती पाटील, मयु राजापकर,विनोद कदम,नितीन आवाडे,धनाजी पोवार,रिपब्लिकन पार्टी दीपक निकाळजे गटाचे दिवा शहर अध्यक्ष दिनेश जाधव त्यांचे सहकारी उपस्थित राहिले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे