*स्त्री शक्ती सन्मान पुरस्काराने महिलांचा गौरव*
ठाणे दि.८- जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने ठाणे जिल्हा जिजाऊ ब्रिगेड आणि सक्षम कन्या विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने डोंबिवली येथील सोनारपाडा येथे आयुष्यात अनेक संकटांचा सामना करून आपल्या कुटुंबाला पुढे नेण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या महिलांना स्त्री शक्ती सन्मान पुरस्काराने गौरविण्यात आले.यावेळी सक्षम कन्या विकास संस्थेच्या अध्यक्षा आणि जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेश उपाध्यक्षा विद्याताई गडाख म्हणाल्या कि महिलांना सर्वच क्षेत्रात सक्षम करणे हेच आमचे उद्दिष्टे आहेत.तर ठाणे जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा प्रा.एकता देशमुख म्हणाल्या कि महिलांवर होणाऱ्या अन्याया विरोधात जिजाऊ ब्रिगेड कायम उभी राहिली आहे आणि यापुढे हि असेल यावेळी या कार्यक्रमाला महिला व बालविकास न्यायदंडाधिकारी मा.संदेश शिरसाट, आकाशवाणी निवेदका पौर्णिमा शिंदे, मुंबई आज तक चे संपादक मनोज जैन, स्टार वन न्युजचे संचालक विशाल कुरकुटे,स्थानिक नगरसेविका प्रमिला मुकेश पाटील, सरपंच मुकेश पाटील,जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हा सचिव स्मिता खडताळे असे मान्यवर आणि अनेक महिला उपस्थित होत्या.