ब्रेकिंग
टोरंट पॉवर विज कंपनीच्या भरमसाठ विज देयकास कंटाळून ग्राहक दिव्यातील नागरिक सुरेश जगताप यांचे आत्महत्येचे निवेदन!
अमित जाधव - संपादक
दिवा पूर्व, मुंब्रादेवी कॉलनी, वारेकर शाळे जवळील, चिंतामणी अपार्टमेंटमधील रहिवासी आणि जेष्ठ नागरीक श्री.सुरेश चतुर जगताप यांच्या घरातील विज पुरवठा आणि विज बिल यामध्ये तफावत असून,गेले वर्षभर अव्वाच्या सव्वा विज देयक टोरंट पॉवर कंपनी आकारत असून, सदर प्रकाराला कंटाळून, आर्थिक परिस्थिती बेताची असल्याकारणाने , पोट भरावे, की विज बिल भरावे, या नैराश्येतून आत्महत्येचे निवेदन आज दिनांक 18 डिसेंबर 2023 रोजी टोरंट पॉवर कंपनीला पत्रकार बांधवांच्या समक्ष दिले.
सतत पाठपुरावा करून देखील कोणतीच दखल घेतली जात नाही त्यामुळे मी हा मार्ग स्वीकारला आहे असे जगताप यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.