शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजेश कुटे यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य शिबीर उत्साहात संपन्न….
अमित जाधव-संपादक
*शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजेश कुटे यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य शिबीर उत्साहात संपन्न.*
पालघर, तारापूर, ता 7 मार्च ( संतोष पडवळ) : शिवसेना पालघर जिल्हाप्रमुख राजेश कुटे यांच्या वाढदिवसानिमित्त आज सोमवार दिनांक ०७ मार्च, २०२२ रोजी तारापूर येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सदर शिबिरात रक्तदाब तपासणी, सामान्य आरोग्य तपासणी, रक्तातील साखरेचे प्रमाण, हिमोग्लोबिन तपासणी, डोळे तपासणी, ईसीजी ई. चाचणी तसेच कोविशील्ड लसीचे लसीकरण यांचा या आरोग्य तपासणी शिबिरात समावेश करण्यात आला आहे.
समाजातील सामान्य व गरजू रुग्णांना उपचाराचे दर परवडत नसल्याने या आरोग्य शिबिराचे आयोजन केल्याचे श्री. राजेश कुटे ह्यांनी सांगितले. विभागातील दोनशे पेक्षा रुग्णांनी या तपासणीचा लाभ घेतला.
प्रसंगी शिवसेना पालघर जिल्हाप्रमुख राजेश शहा, पालघर जिल्हापरिषद अध्यक्षा वैदेहीताई वाढाण, शिवसेना पालघर विधानसभा क्षेत्रप्रमुख वैभव संखे, जिल्हा परिषद सदस्य (तारापूर गट) प्रकाश निकम, जिल्हा परिषद सदस्य नीता समीर पाटील, पालघर तालुका प्रमुख विकास मोरे, माजी कृषी सभापती सुशील चुरी तसेच विभागातील सर्व शिवसेना आजी माजी पदाधिकारी, युवासैनिक, महिला आघाडी उपस्थित होते.


