बेधडक ठाणे न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

सामाजिक कार्यकर्ते गणेश हिरवे यांच्याकडून ग्रंथालयासाठी १०० हून अधिक नवीन पुस्तकं भेट….

अमित जाधव-संपादक

सामाजिक कार्यकर्ते गणेश हिरवे यांच्याकडून ग्रंथालयासाठी १०० हून अधिक नवीन पुस्तकं भेट

 

जोगेश्वरी पूर्व येथील सामाजिक कार्यकर्ते,पत्रकार,शिक्षक गणेश हिरवे यांनी नुकतीच गोवंडीतील मनपा माध्यमिक शाळेसाठी हिंदी, मराठी आणि इंग्रजी भाषेतील शंभरहून अधिक पुस्तक व मासिक भेट स्वरूपात दिली.सध्या सोशल मीडियाच्या जमान्यात दिवसेंदवस वाचन कमी होत आहे व प्रत्यक्षात पुस्तक हातात घेऊन वाच्णाऱ्यांची संख्या रोडावत चालली आहे.अशा वेळी गोवंडीतील मनपा शाळेने नव्यानेच उघडलेल्या लायब्ररीसाठी मोहम्मद असलम सर यांच्या विंनतीला मान देऊन त्यांना ही पुस्तक विनामूल्य भेट देण्यात आली.सध्या मोबाईलवरील गेम्स, मीमस व इतर अनेक गोष्टींकडे तरुणांचे अधिक लक्ष असते,त्यामनने त्यांच्यकडून इतर अनेक चांगले मेसेज स्कीप केले जातात.पुस्तके आपल्या जीवनात दीपगृहाचे काम करतात. मंडाले तुरुंगात शिक्षा भोगत असताना लोकमान्य टिळकांनी गीतारहस्य या ग्रंथाची निर्मिती केली. पुस्तकांसारखा सोबती-मित्र नाही, तसेच लेखन व वाचन यांसारखे चांगले छंद नाहीत असे हिरवे सर आवर्जून सांगतात.मागील वीस बावीस वर्षात सरांनी तेरा हजारांहून अधिक पुस्तक अनेक संस्था,शाळा, ग्रंथालये, यांना विनामूल्य दिलेली आहेत..अनेकवेळा शुभप्रसंगी काय भेट देता येईल असा प्रश्न आपल्यासमोर असतो,तेव्हा भेटवस्तू बरोबरच एखाद छानस पुस्तक आपण नक्कीच भेट देऊ शकतो यावर हिरवे सर जोर देतात.हिरवे सर स्वतः वैयक्तिकपणे सर्वांना सहकार्य करतातच पण त्यांच्या जॉय ऑफ गिविंग संस्थेच्या वतीनेही त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबविलेले आहेत. लॉक डाऊन काळातही हिरवे सर व त्यांच्या जॉय संस्थेने अनेकांना भरीव सहकार्य केलं आणि आजही त्यांच हे कार्य असेच सुरू आहे.गणेश सरांच्या या विनामूल्य पुस्तक-मासिक भेट देण्याच्या उपक्रमाचे सर्वांनीच खूप कौतुक केलेलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे