दिनांक ३०/०४/२०२४ रोजी ०२:२१ वाजताच्या सुमारास आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे प्राप्त झालेल्या घटनेच्या माहितीनुसार शिळ-महापे रोड, शिळ, दिवा, ठाणे (प.) या ठिकाणी महापेकडून शिळ फाटाकडे येणाऱ्या रोडवरती महापेवरून दिवा येथे २५ टन माती घेऊन जाणार डंपर या मातीची वाहतूक करणाऱ्या एका डंपरला आग लागली होती. *सदर घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान ०१-फायर वाहनासह उपस्थित होते. सदर घटनेत कोणालाही दुखापत नाही.सदर ठिकाणी लागलेली आग अग्निशमन दलाच्या जवानांकडून ०२:५६ वाजताच्या सुमारास पूर्णपणे विझविण्यात आली असून, परिस्थिती नियंत्रणात आहे.*