मागील चोवीस तासात दिवा व मुंब्रा परिसरात 3 मृतदेह सापडले
दिवा-बुधवारी मागील चोवीस तासात वेगवेगळ्या ठिकाणी तीन अनोळखी मृतदेह आढळून आल्याने दिवा मुब्रा परिसरात खळबळ उडाली आहे.पहिला मृत देह मुब्रा येथे सोनाजी नगर चर्च जवळ तर दुसरा मृतदेह दिवा खर्डी गाव येथे अभियांत्रिकी महाविद्यालय जवळ आढळून आला असून मृतदेहा जवळ बांधकामासाठी वापरण्यात येणारे मेजर टेप पोलिसांना आढळले आहे.तिसरा मृत देह बुधवारी रेतीबंदर खाडीत आढळून आला.तिन्ही मृतदेह पोलिसांनी पंचनाम्यानंतर शवविच्छेदन करण्यासाठी कालव्यात छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात पाठवण्यात आले पुढील कारवाई व मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी पोलीस पुढील तपास करत आहेत