बेधडक ठाणे न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

क्रिडा व मनोरंजनब्रेकिंगमहाराष्ट्र

सप्तसूर कलामंचची गायन स्पर्धा उत्साहात पार….

अमित जाधव-संपादक

*सप्तसूर कलामंचची गायन स्पर्धा उत्साहात पार.*

कल्याण, ता 15 फेब्रु, (संतोष पडवळ) : – सप्तसूर कलामंच यांनी कल्याणच्या राममारूती मंदिराच्या सभागृहात कल्याण – डोंबिवली विभागातील नवोदित गायक गायिकांसाठी कराओके गायन स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत परिसरातील चाळीस स्पर्धकांनी उपस्थिती नोंदवली. या स्पर्धेचे आयोजक राजश्री यशवंतराव व कल्पेश यशवंतराव होते. कराओके गायन स्पर्धेत प्रथम क्रमांक मुदस्सर यांनी तर द्वितीय क्रमांक हिमांशू पांडे आणि तृतीय क्रमांक मोहन बडगुजर यांनी पटकावला. विजेत्या स्पर्धकांना सन्मानचिन्हं व सन्मानपत्रं देण्यात आली. तर सहभागी स्पर्धकांना सन्मानपत्रं दिली गेली.

प्रसंगी कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणा म्हणून लेखक-दिग्दर्शक तथा शब्द खड्गचे संपादक वरिष्ठ पत्रकार प्रा. दिपक जाधव उपस्थित होते. स्पर्धेचे परीक्षक म्हणून स्वरांजली संस्थेचे प्रमुख राजेश कुलकर्णी . विशाल राॕय आणि नाटककार – संगीतकार सीमा फडके यांनी काम पाहिले.

सदर स्पर्धा यशस्वी होण्यासाठी विनय डांगे आणि मेधा चिडगुपकर यांनी विशेष परिश्रम घेतले. सहभागी गायक गायिका. विजेते स्पर्धक तथा मान्यवरांचा सत्कार स्पर्धेचे आयोजक राजश्री व कल्पेश यशवंतराव यांनी केला. उत्तरोत्र कार्यक्रम बहारदार होत गेला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सीमा हुले यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे