ठाणे, दिवा ता ११ जून : दिवा शहरात रोटरी क्लब ऑफ दिवा ची स्थापना २०१७ मधे झाली. तेव्हापासून रोटरी क्लब क्लबचे ८ वे अध्यक्ष म्हणून आदित्य रविंद्र पाटील यांची तर सचिवपदी अंकुर उदय मुंडे यांची नियुक्ती रोटरी जिल्हा ३१४२ चे प्रांतपाल श्री. दिनेश मेहता यांच्या हस्ते करण्यात आली आहे.
रोटरी क्लब ऑफ दिवाच्या माध्यमातून अनेक सामाजिक कार्य केले जातात. मागच्या वर्षीचे अध्यक्ष हर्षद भगत यांच्या काळात रक्तदान शिबिर, रायगड जिल्ह्यातील पाषाने गावातील जि. प. शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप, घे भरारी च्या माध्यमातून १० वी व १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार व त्यांना मार्गदर्शन, आदिवासी पड्या मधे मुलींना शाळेत येण्या जाण्यसाठी सायकल वाटप, पर्यावरणच्या दृष्टीने इको फ्रेंडली गणेश मूर्ती कार्यशाळा घेण्यात आले, मोफत PUC कँप राबवला, आंतरशालेय चित्रकला स्पर्धा घेतली, दिवा पोलिस स्टे. ला पाण्याचा फिल्टर व बॅरिकेट्स देण्यात आले, महिलांना स्वयंरोजगार प्राप्त व्हावा या उद्देशाने शिलाई मशिनचे वाटप आदी सामाजिक कामे करण्यात आली.
तसेच या वर्षी देखील अनेक सामाजिक कार्याची ध्येय ठेवण्यात आली आहेत. रोटरी क्लबच्या सदस्यांचा दिवा शहरात डायलिसिस केंद्र उभारण्याचा निर्धार आहे त्याची सुरवात या वर्षी पासून करण्यात येईल असे अध्यक्ष आदित्य पाटील यांच्या कडून सांगण्यात आले.