बाळासाहेब ठाकरे जयंतीनिमित्त लायन्स क्लब ऑफ ठाणे व संस्कार सेवा संस्था आयोजित महाआरोग्य शिबीर उत्सहात…..
अमित जाधव-संपादक
*⭕️बाळासाहेब ठाकरे जयंतीनिमित्त लायन्स क्लब ऑफ ठाणे व संस्कार सेवा संस्था आयोजित महाआरोग्य शिबीर उत्सहात.*
ठाणे, ता 24 जाने ( संतोष पडवळ) : बाळासाहेब ठाकरे जयंतीनिमित्त लायन्स क्लब ऑफ ठाणे, कोपरी प्ल्याटीनियम हॉस्पिटल, वाविकर हॉस्पिटल व संस्कार सेवा संस्था आयोजित महाआरोग्य शिबीर ठाण्यातील कोपरी विभागात उत्सहात पार पडले सदर शिबिराला प्रचंड प्रतिसाद लाभला.शिबिराला भेट देण्यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, खासदर श्री.राजन विचारे, महापौर श्री.नरेश म्हस्के, आमदार श्री.रवींद्र फाटक, उपमहापौर पल्लवी पनवी कदम, ठाणे विधानसभा क्षेत्र प्रमुख श्री.हेमंत पवार, परिवहन सभापती श्री.विलास जोशी, सिन्नर नाशिक संपर्क प्रमुख श्री.संजय बच्छाव, नगरसेविका सौ.मालती पाटील, सौ.नम्रता पमनानी, सौ शर्मिला गायकवाड, परिवहन सदस्य श्री.प्रकाश कोटवानी, कळवा विभाग प्रमुख श्री. रवि पाटील,
कोपरी विभागातील सुमारे ६५० नागरिकांनी या शिबीराचा लाभ घेतला.
शिबिरा करीता डॉ. वाविकर हॉस्पिटल,प्लॅटिनम हॉस्पीटल, स्पेक्ट्रम लॅब, धर्मवीर आनंद दिघे हृदय रोग उपचार केंद्र, आरोग्यम धनसपदा, संस्कार सेवा संस्था यांचे बहुमूल्य सहकार्य लाभले .
शिवसेना कोपरी विभागातील सर्व पदाधिकारी, महिला आघाडी, शिवसैनिक, या वेळी मोठ्या संखेने उपस्थित होते.आयोजक स्वप्नील लांडगे यांनी सर्व मान्यवरांचे सन्मान केले व सुत्रसंचालन नरेंद्र जव्हेरी यांनी केले.