दिवा शहरात मा.नगरसेविका दीपाली उमेश भगत यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन,दिव्यातील शेकडो नागरिकांनी रक्तदान करत “रक्तदान हे श्रेष्ठदान”हे दाखवून दिले..
अमित जाधव-संपादक
ठाणे (प्रतिनिधी) दिवा शहरातील नागरीकांच्या सेवेसाठी नियमीत तत्पर असणाऱ्या माजी नगरसेविका सौ.दिपाली उमेश भगत यांनी आयोजित केलेल्या आकांक्षा सभागृह येथील रक्तदान शिबीराला महिला, युवक व ज्येष्ठ नागरिकांच्या सहकार्याने दरवर्षीप्रमाणे उत्स्फुर्तपणे प्रतिसाद लाभला. या रक्तदान शिबीरात 200 पेक्षा जणांनी रक्तदान करुन सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.
रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे. या उक्तीप्रमाणे माजी नगरसेविका सौ.दिपालीताई भगत या गेल्या 18 वर्षापासून रक्तदान शिबीर राबवित आहेत. इतर नागरिकांप्रमाणेच त्यांनी स्वतः रक्तदान करुन आपली सामाजिक भुमिका पार पाडली, या रक्तदान शिबीरात एकूण 170 पेक्षा जास्त रक्त पिशवी संकलित करण्यात आली आहे. कोरोनाकाळात शिवसेना विभागप्रमुख श्री. उमेश भगत आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी रक्तदान शिबीरे भरवून लोकांची मने जिंकली होती.
दरम्यान रक्तदान शिबिराला उत्स्फुर्त प्रतिसाद देवून रक्तदानाचे महान कार्य पार पाडणाऱ्या सर्वांचे,आपल्या सर्व सहकाऱ्यांचे आणि डोंबिवली येथील चिदानंद चँरिटेबल ट्र्स्ट ब्लट सेंटरचे इनचार्ज बिजोय मंथो आणि स्टाफचे माजी नगरसेविका सौ.दिपालीताई उमेश भगत यांनी आभार मानले.