खासदारावर केलेली टीका म्हणजे निव्वल प्रसिद्धी साठीच, दिवा शहर शिवसेनेना रोखठोक…

केलेल्या विकास कामांवरच विजयाची हॅट्रिक मारणाऱ्या संसदरत्न खासदारांवर निव्वळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी टीका*
दिवा -खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी दिवा शहरासहीत संपूर्ण लोकसभा क्षेत्रात विकास कामांचा डोलारा उभा केला असल्यामुळेच दिवेकर जनतेने त्यांना तिसऱ्यांदा मोठ्या मताधिक्याने लोकसभेवर पाठवलं आहे. खासदार डॉ.श्रीकांत शिंदे साहेब यांच्या पुढाकाराने व शिवसेना शहरप्रमुख रमाकांत मढवी यांच्या नेतृत्वाखाली दिव्यात रस्ते, आरोग्य, पाणी, शिक्षण अशा मूलभूत सुविधा नागरिकांना देण्यामध्ये शिवसेना यशस्वी झाली आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत देखील शिवसेनेचा मोठ्या फरकाने विजय झाला आहे, त्यात दिवा शहराचा मोठा वाटा आहे. दिवेकर जनतेने दाखवलेल्या विश्वासमुळेच आणि शिवसेनेवर असलेल्या प्रेमामुळेच हा विजय झाला होता. मोठमोठ्या नेत्यांवर टीका करून खमंग प्रसिद्धी मिळवण्यासाठी धडपडणाऱ्या नेत्यांनी, प्रश्न असतील तर जनतेमध्ये जाऊन जनतेला सोबत घेऊन ते सोडवण्याचे प्रयत्न केल्यास, महापालिकेच्या निवडणुकीत उरली- सुरली इज्जत वाचवता येईल. अन्यथा लोकसभा आणि विधानसभेप्रमाणे दारुण पराभवाला सामोरे जावं लागेल हे लक्षात ठेवा. असा प्रेमाचा सल्ला शिवसेना दिवा शहरातर्फे देण्यात आला आहे.असे दिवा शहर शिवसेनेच्या वतीने यावेळी कळविण्यात आले आहे.