ब्रेकिंग
दिव्यात चार जणांच्या टोळक्याने मिळून केली एकाची हत्या,खबर देणाराच ठरला गुन्हेगार.. मुंब्रा पोलिसांच्या अथक प्रयत्नांनी चारही जन अटकेत..
अमित जाधव - संपादक
मुंब्रा पोलीस ठाणे दाखल दखलपात्र गुन्ह्याची माहिती
मुंब्रा पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हा रजिस्टर नंबर*- 1680/2024 भा न्या स कलम 103(1), 238, 217, 3(5) प्रमाणे दिनांक दिनांक 24/07/2024 रोजी पोलिस उप निरीक्षक राजेंद्र रामचंद्र किंगरे यांच्या तक्रारीवरून दिवा येथील बी आर नगर येथे सिद्धार्थ बौद्ध विहराजवल एका व्यक्तीला चार आरोपींनी कोणत्यातरी कठीण हत्याराने व लाथा बुक्याने जबर मारहाण करत साक्षीदार रिक्षा चालक नागराज पलानी यांच्या रिक्षातून त्यास बुद्ध विहार मागील परिसरातील झाडी झुडपात टाकून पलायन केले आहे असे प्रथम दर्शनी तक्रार दाराने कळविले असताना पोलिसांनी घटनास्थळी त्वरीत धाव घेतली असता आरोपींनी केलेल्या मारहाणीत सदर व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले.
मुंब्रा पोलिसांनी त्वरित तपासाची चक्रे फिरवत रितेश राजेंद्र प्रसाद राजभर ,सुलतान मेहमूद शेख आकाश शरद भोईर,जितेश शरद भोईर,आरोपी १ ते ३ ताब्यात घेण्यात आले आहे*- आरोपी अटकेची कार्यवाही सुरू आहे. तसेच चौथा आरोपी देखील ताब्यात घेण्यात येत आहे.महत्वाचे म्हणजे मत्यूची खबर देणाराच आरोपी असून सुलतान मेहबूब शेख ह्याने देखील मयत इस्मास मारहान केली असून पोलिसांना आकस्मित मृत्यूची खोटी माहिती देत दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत होता त्यास संशयावरून पोलिसी खाकी दाखवली असता जबाबात स्पष्ट केलं आहे
गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक पाचोरकर नेमणूक मुंब्रा पोलीस स्टेशन हे करीत असून कायदा व सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न नाही परिस्थिती शांत आहे.असे अनिल शिंदे ,वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मुंब्रा पोलीस स्टेशन यांनी कळविले आहे