दिवा गावच्या प्रवेशद्वारा जवळची कचराकुंडी अखेर ग्रामस्थानीच हटवली, कचराकुंडी च्या जागी दिवा गाव स्वागत वास्तू उभारली….
अमित जाधव-संपादक
दिवा गावच्या प्रवेशद्वारा जवळची कचराकुंडी अखेर हटवली
कचराकुंडी च्या जागी दिवा ग्रामस्थांनी उभारली स्वागत वास्तू
*दिवा गाव* च्या प्रवेशद्वारा जवळ असलेली कचराकुंडी हटवावी अशी मागणी गेल्या काही वर्षांपासून दिवा ग्रामस्थ करत होते. अँड. आदेश भगत यांनी यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला होता. काल दिवा गावात हनुमान जन्मोत्सव व आई गावदेवी चा पालखी सोहळा असल्याने हेच निमित्त शोधत अखेर ही कचराकुंडी हटविण्यात आली व त्याठिकाणी सुंदर अशी गावच नाव असणारी स्वागत वास्तू उभारण्यात आली.
दिवा गाव पश्चिम च्या प्रवेशद्वारा जवळच असलेल्या कचराकुंडीमुळे स्थानिकांमध्ये प्रचंड नाराजी होती. गावात प्रवेश करते वेळीच ही कचराकुंडी असल्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात घाण कचरा व दुर्गंधी पसरलेली असायचा. दिवा गावात प्रवेश करण्यासाठी हा एकमेव मुख्य रस्ता असल्याने येथे नेहमीच प्रचंड वर्दळ असते बऱ्याच वेळा ही कचराकुंडी संपूर्ण भरून सर्व कचरा रस्त्यावर येत असल्यामुळे येथून वाट काढणे देखील कठीण झाले होते.
दिवेकारांच्या स्वागताला उभी असलेली ही कचराकुंडी त्वरित हटवावी व कचरा संकलन करण्यासाठी अन्य पर्याय शोधावा अशी मागणी अँड आदेश भगत यांनी अनेक वेळा केली होती. पण सदर मागणी कडे सातत्याने दुर्लक्ष केले जात असल्यामुळे गावकऱ्यांनी स्वतःच ही कचराकुंडी हटवून त्या ठिकाणी *माझा दिवा गाव माझा अभिमान* अशी टॅग लाईन असलेलं सुंदर फलक येथे उभं केलं आहे.
अँड.आदेश भगत यांनी स्वतः पुढाकार घेऊन एका दिवसात हा बदल घडवून आणला असल्यामुळे दिवा ग्रामस्थांनी त्यांचे आभार व्यक्त केले.