रोटरी क्लब ऑफ दिवा आयोजित दहावी- बारावी उत्तीर्ण विद्यार्थी गुणगौरव सोहळा सपन्न…
अमित जाधव - संपादक
ठाणे, दिवा ता. 28 जुलै : रोटरी क्लब ऑफ दिवा, ठाणे व शिवदत्त ज्ञानप्रसारक विद्या मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने अवधूत हॉलमध्ये आज 28 जुलै रोजी दिवा शहरासह आजूबाजूच्या परिसरातील शाळांतील दहावी-बारावी (मराठी, इंग्रजी व हिंदी माध्यम) व कला, वाणिज्य व विज्ञान शाखेतील यशस्वी उत्तीर्ण विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहात सपन्न झाला. इयत्ता 10 वी (मराठी माध्यम) आदित्य डामरे 94.60), श्वेता सावरटकर (94.00)अमिता हरम (93.40) श्रावणी पालकर (93.40) तर 10 वी (इंग्रजी माध्यम) खुशी गुप्ता (94.00), ऋतिक घुग (93.80), सुब्रतो घोष (93:40)
प्रसंगी रोटरी क्लब ऑफ दिवा, ठाणेचे अध्यक्ष – हर्षद भगत, सचिव आदित्य पाटील, साईनाथ म्हात्रे, वैष्णव पाटील, अभिषेक ठाकूर, स्वप्नील गायकर, युवराज बेडेकर, मोहित भोईर, प्रतीक बेडेकर, गजानन पाटील, किशोर पाटील, नंदुकुमार किणे,अभिजित अलीमकर यांच्यासह दिव्यातील अनेक शाळांतील शिक्षकवृंद आदी मान्यवर उपस्थित होते