Breaking
ब्रेकिंग

दिवा शहरातून १९.०३ कोटी मालमत्ता कर जमा तरीही दिव्यात असुविधा, ठामपाने पार केला मालमत्ता कर वसुलीचा ५०० कोटींचा टप्पा….

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 7 4

ठामपाने पार केला मालमत्ता कर वसुलीचा ५०० कोटींचा टप्पा

ठाणे : मालमत्ता कर भरण्यासाठी ठाणेकर नागरिकांनी दिल्यामुळे प्रतिसादामुळे सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात ५०० कोटी रुपये इतका मालमत्ता वसुलीचा टप्पा पार झालेला आहे. गेल्यावर्षी या कालावधीपर्यत ३५० कोटी रुपये एवढा मालमत्ता कर वसुल झाला होता. ठाणेकर नागरिकांनी मालमत्ता कर भरुन महापालिकेस केलेल्या सहकार्याबद्दल आयुक्त अभिजीत बांगर यांनी ठाणेकरांचे आभार व्यक्त केले आहेत.

मागील वर्षाच्या तुलनेत सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात १५० कोटी रुपयांपेक्षा जास्त मालमत्ता कराची वसुली झाली आहे. असे असले तरी काही करदात्यांनी अद्यापपर्यत आपला कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. मालमत्ता कराची देयके विहित पध्दतीने मालमत्ताधारकांकडे पोहचविण्यात आली असून विहित मुदतीत आपला मालमत्ता कर भरणे आवश्यक आहे. ठाणेकर घरबसल्या ऑनलाईन कर भरणा करू शकतात. त्यामुळे त्यांनी या सुविधेचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.

कर भरुन महापालिकेस सहकार्य करावे

ज्या करदात्यांनी अद्यापपर्यंत मालमत्ता कर भरलेला नाही अशा करदात्यांनी त्यांच्या मालमत्तेवर कर वसुलीच्या कारवाईअंतर्गतची अप्रिय घटना टाळण्याच्या दृष्टीकोनातून आपला मालमत्ता कर महापालिकेकडे विनाविलंब भरुन महापालिकेस सहकार्य करावे.

अभिजीत बांगर – आयुक्त, ठाणे महापालिका*

तक्ता –

*प्रभागसमिती निहाय झालेली वसुली*

उथळसर– ३४.४३ कोटी

नौपाडा कोपरी – ६३.१४ कोटी

कळवा- १६.९४ कोटी

मुंब्रा – १९.०५ कोटी

दिवा- १९.०३ कोटी

वागळे इस्टेट- १६.५५ कोटी

लोकमान्य सावरकर – १९.१० कोटी

वर्तकनगर – ७७.४६ कोटी

माजिवडा मानपाडा – १७३.९८ कोटी

ठाणे महापालिका मुख्यालय – ६२.४३ कोटी

*एकूण – ५०२.१२ कोटी.*

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे