0
2
0
9
7
4
ठाणे, दिवा ता 16 जून : दिवा शहरातील दातीवली गावचे बबन हशा दळवी (वय 76) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे, दातिवली गावचे प्रभावी व्यक्तीमत्व असलेले स्व. बबन दळवी यांच्या पश्चात एकूण पाच विवाहीत मुली आहेत. अतिशय प्रतिकुल परिस्थितीत दळवी यांनी आपल्या पाचही मुलींचे शिक्षण पूर्ण करून विवाह करून दिले. दळवी यांचे सन ८०/९० च्या दशकात सामाजीक कार्यात महत्वाचे योगदान दिले होते, दातीवाली गावातील सर्व सामाजिक, धार्मिक व शैक्षणीक उपक्रमात ते नेहमी हिरहीरीने सहभागी होत असत. स्व.दळवी यांचे ग्रामस्थ, सामाजीक व राजकीय व्यक्तीबरोबर सलोख्याचे हितसंबध होते.
स्व. बबन हशा दळवी यांचा दशक्रिया विधी बुधवार दि. २१ जून २०२३ रोजी सकाळी ९ वा. खरपेश्वर मंदीर (म्हातर्डी गाव) येथे होणार हे असुन तेरावे विधी २४ जून रोजी दुपारी राहत्या घरी करण्यात येईल.
0
2
0
9
7
4



