दिव्यात आगरी महिला शक्ती प्रतिष्ठान च्या वतीने साईसेवा रुग्णालयाची स्थापना…दिव्यातील मध्यमवर्गीयांसाठी उपयुक्त असे रुग्णालय, दीवावासियाणी लाभ घ्यावा… मा.नगरसेवक शैलेश पाटील
अमित जाधव - संपादक
दिवा शहरात आगरी महिला शक्ति प्रतिष्ठान च्या वतीने आज साइसेवा रुग्णालय सुरू करण्यात आले आहे.रुग्णालयाचा उद्घाटन सोहळा दिवा शहराचे शिवसेनेचे मा.नगरसेवक व उपशहर प्रमुख शैलेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले रुग्णालयातील सुविधा दीवावासियांसाठी उपलब्ध केल्याबद्दल मा.शैलेश पाटील यांनी कौतुक करत दिवेकर नागरिकांसाठी एक उपयुक्त असे रुग्णालय सुरू झालं त्याबद्दल सर्वांनी याचा लाभ घ्यावा असे यावेळी स्पष्ट केले व आगरी महिला शक्ति प्रतिष्ठान च्या सर्व महिलांच अभिनंदन करत आभार व्यक्त केलं.
हे रुग्णालय दिवा शहरातील जनते साठी पूर्ण वेळ सेवा देत असून मल्टीस्पेशालिटी व आय सी यू विभाग देखील उपलब्ध आहे तर सामाजिक दृष्ट्या हे रुग्णालय इतर रुग्णालया पेक्षा मध्यमवर्गीयांसाठी अत्यंत उपयुक्त आहे याचा विचार करूनच आज आगरी महिला शक्ति प्रतिष्ठान च्या सर्व महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हे उपलब्ध केले आहे असे प्रतिष्ठानच्या अध्यक्ष व संस्थापिका उषाताई मुंडे यांनी यावेळी बोलताना सागितले.
प्रसंगी रंजना मुंडे,सविता वायले,पुनम मुंडे,दीपिका मुंडे,सोनम मुंडे,भरती पाटील,ज्योती म्हात्रे,भरती वसंत म्हात्रे,प्रीती पाटील,योगिता मुंडे,रंजना तांडेल आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते