पोलीस अधिकाऱ्याचा दुसरी पोलीस अधिकारी पत्नीवर अत्याचार ; पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल….
अमित जाधव-संपादक
⭕️पोलीस अधिकाऱ्याचा दुसरी पोलीस अधिकारी पत्नीवर अत्याचार ; पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल.
संतोष पडवळ-कार्यकारी संपादक
पुणे, ता 29 ऑक्टोबर: पुण्यात महिला पोलीस अधिकाऱ्यावर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ऐका 33 वर्षीय पीडित महिला पोलीस अधिकाऱ्याने बंडगार्डन पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षका विरोधात खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने 2013 पासून पीडितेचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप फिर्यादीत केला आहे. खडकी पोलिसांनी आरोपी पोलीस निरीक्षकाविरोधात विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
हरीश सुभाष ठाकूर असं गुन्हा दाखल झालेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षकाचं (PI) नाव असून त्यांची पुण्यातील बंडगार्डन पोलीस ठाण्यात नेमणूक आहे. आरोपी PI ठाकूर याने पहिल्या पत्नीसोबत घटस्फोट झाल्याची खोटी माहिती देऊन पीडित महिला पोलीस अधिकाऱ्यासोबत विवाह केला होता. लग्नानंतर फिर्यादीने सतत शारीरिक आणि मानसिक त्रास देत अत्याचार केले. फिर्यादी महिला या पुण्यातच (PSI) पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत आहेत.
याशिवाय 2015 साली मुंबई येथील घरी असताना, आरोपीनं फिर्यादीला जीवे मारण्याच्या हेतूने तिच्यावर गोळी झाडल्याचं देखील तक्रारीत म्हटलं आहे. गोळीबाराच्या या घटनेत फिर्यादीत्या डाव्या हाताच्या बोटाला दुखापत झाल्याचंही त्यांनी आपल्या तक्रारीत म्हटलं आहे.
आरोपीच्या दबावाला घाबरून पीडित महिला अधिकारी इतके दिवस तक्रार देत नव्हती. पण अलीकडेच आरोपीनं लग्नाची नोंदणी करण्यास टाळाटाळ केल्याने पीडित महिलेनं खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. खडकी पोलिसांनी विविध कलमाअंतर्गत आरोपी पोलीस अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास खडकी पोलीस करत आहेत.