बंदर व गोदी कामगारांना १२ हजार रुपये बोनस (PLR) मिळणार…
अमित जाधव-संपादक
*बंदर व गोदी कामगारांना १२ हजार रुपये बोनस (PLR) मिळणार*
— मुंबई 🙁सुभाष शांताराम जैन): भारतातील प्रमुख बंदरांच्या मान्यताप्राप्त कामगार महासंघानी घेतलेल्या भूमिकेप्रमाणे इंडियन पोर्ट असोसिएशन (IPA) व नौकानयन मंत्रालयाच्या आदेशानुसार सर्व प्रमुख बंदरांचा ५० टक्के व प्रत्येक बंदराचा ५० टक्के या तत्वानुसार बोनस देण्याचे तत्वतः मान्य केले आहे. त्यानुसार मुंबई बंदरातील कामगारांना १२ हजार रुपये ऍडव्हान्स बोनस ऑक्टोबर २०२१ च्या पगारामध्ये दिला जाणार आहे. असे मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे जनरल सेक्रेटरी सुधाकर अपराज यांनी सांगितले.
नौकानयन मंत्रालयाच्या सूचनेप्रमाणे सर्व बंदरांचा २० टक्के व प्रत्येक बंदराचा ८० टक्के या तत्त्वानुसार बोनस (PLR) दिला जावा अशी सूचना होती. त्याप्रमाणे केंद्रीय मंत्रिमंडळाने त्यास मान्यता दिली होती. परंतु २०१९ मध्ये मान्यताप्राप्त फेडरेशन व आयपीए यांच्यामध्ये झालेल्या समझोता करारानुसार २०२०-२१ वर्षाचा बोनस (PLR) ५०:५० टक्के या तत्वानुसार मिळावा अशी मागणी मान्यताप्राप्त कामगार महासंघानी केली होती. त्याप्रमाणे बोनस देण्याचे मान्य झाले आहे. यासाठी पुन्हा केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी लागेल म्हणून दिवाळीपूर्वी बोनसची ॲडव्हान्स रक्कम रुपये १२ हजार रुपये ऑक्टोबर महिन्याच्या पगारात दिली जाणार आहे. यासाठी मुंबई पोर्ट ट्रस्टचे चेअरमन राजीव जलोटा यांनी मान्यता दिली आहे. मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर नेमकी रक्कम येईल त्यानुसार कमी असल्यास उर्वरित रक्कम दिली जाईल व जास्त असल्यास कापून घेतली जाईल.
१ जानेवारी २०१७ पूर्वीचे जे पेन्शनर्स आहेत, त्यांना ऑक्टोबर २०२१ च्या पेन्शनमध्ये १० टक्के थकबाकी मिळणार आहे, अशी माहिती युनियनचे प्रसिद्धिप्रमुख मारुती विश्वासराव यांनी दिली.मारुती विश्वासराव
प्रसिद्धिप्रमुख.मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियन.
असे पत्रकार, छायाचित्रकार सुभाष शांताराम जैन कळवितात.