*⭕️एसटी बस व ट्रकचा भीषण अपघातानंतर वाहने पेटली.*
संतोष पडवळ-कार्यकारी संपादक
अकोला, 6 ऑक्टोब : अकोला जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात झाला आहे. एसटी बस आणि ट्रक यांच्यात हा अपघात झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की, अपघातानंतर बसने पेट घेतला. ही संपूर्ण घटना मोबाइल कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याचे व्हिडीओ समोर आले आहेत. अपघातानंतर एसटी बसने तात्काळ पेट घेतला. या अपघातात दहा प्रवासी जखमी आणि बस चालक गंभीर असल्याची प्राथमिक माहिती आली आहे.
बस खामगाव येथून अकोलाकडे जात होती. ट्रक अकोल्या वरून खामगांव कडे जात होता. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील शेळद फाट्या जवळ हा अपघात झाला आहे. ट्रक आणि एसटी बस यांच्यात समोरासमोर धडक झाली आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, पोलिसांनी घटनास्थळी मदतीसाठी धाव घेत मदतकार्य सुरू केले. बसने पेट घेतल्याने बचावकार्यात अडथळा येत होता.