महाराष्ट्र कोष्टी सेवा मंडळ मुंबई व विटा यंत्रमाग संघाच्या संयुक्त विद्यमाने वस्त्रोद्योग परीषद संपन्न* महाराष्ट्रातील कोष्टी समाजाची शिखर संस्था महाराष्ट्र
अमित जाधव-संपादक
*महाराष्ट्र कोष्टी सेवा मंडळ मुंबई व विटा यंत्रमाग संघाच्या संयुक्त विद्यमाने वस्त्रोद्योग परीषद संपन्न*
महाराष्ट्रातील कोष्टी समाजाची शिखर संस्था महाराष्ट्रO कोष्टी समाज सेवा मंडळ व विटा यंत्रमाग औद्योगीक सहकारी संघाच्या संयुक्त विद्यमाने विटा यंत्रमाग सभागृहामध्ये पारंपारीक विणकाम करणाऱ्या विणकरांच्या समस्यांबाबत विचारविनिमय व उपाययोजनांची चर्चा करण्यासाठी राज्यातील विविध क्षेत्रातील तज्ञांच्या उपस्थितीमधे वस्त्रोद्योग परीषद संपन्न झाली.ही परीषद ॲाफ लाईन व ॲानलाईन पद्धतीने झाली राज्यातील इचलकरंजी,फलटण,विटा,वडवणी,पेठवडगांव,कोल्हापुर,नाशिक,पुणे,मुंबईसह अनेक ठिकाणचे कोष्टी समाज पदाधिकारी या परिषदेस उपस्थित होते.
या परिषदेच्या अध्यक्षस्थानी कोष्टी सेवा मंडळांचे अध्यक्ष प्रकाशराव सातपुते होते. परीषदेच्या चर्चासत्रामध्ये वीज प्रश्न दरप्रश्नी वीज तज्ञ प्रताप होगाडे,निर्यात संधीबाबत पॅावरलुम डेव्हलपमेंट एक्सपोर्ट्सचे गजाननराव होगाडे,बॅंक क्षेत्रातील समस्यांबाबत इचलकरंजी जनता बॅंक संचालक महेश सातपुते तर विकेंद्रीत यंत्रमागासमोरच्या समस्या व उपाययोजनांबाबत इचलकरंजी पॅावरलुम असशिएशनचे अध्यक्ष सतिश कोष्टी व विटा यंत्रमाग संघाचे अध्यक्ष किरण तारळेकर यांनी मनोगत व्यक्त केली.
दिपप्रज्वलनानंतर विटा देवांग समाजअध्यक्ष दत्ताभाऊ चोथे यांनी स्वागत केले . प्रास्तावीकामध्ये महाराष्ट्र कोष्टी सेवा मंडळांचे अध्यक्ष प्रकाशराव सातपुते यांनी विणकाम व्यवसाय असलेल्या कोष्टी समाजाच्या पारंपारीक विणकाम क्षेत्रातील समस्यांबाबत या चर्चासत्रातुन चर्चा होऊन एक सर्वकष निवेदन राज्यातील व केंद्रातील शासन प्रतिनिधींना देऊन या समस्या दुर करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगुन सर्वांचे स्वागत केले.वीज तज्ञ प्रतापराव होगाडे यांनी महाराष्ट्रातील विद्यमान वीज दर व सवलतींबाबत माहीती देऊन शेजारच्या कर्नाटक,गोवा सारखी इतर राज्ये रोजगारनिर्मीतीसाठी वस्त्रोद्योगास देऊ करीत असलेल्या वीजदर सवलतींबाबत माहीती दीली व मार्गदर्शन केले.गजाननराव होगाडे यांनी साध्या यंत्रमागावरदेखील निर्यातक्षम कापडउत्पादन घेता येते व वस्त्रेद्योगाच्या एकुण निर्यातीमध्ये साध्या यंत्रमागाच्या कापडनिर्यातीचा वाटा खुप मोठा असुन केवळ ग्रे कापड विक्री करण्याएवजी मुल्यावर्धित कापड उत्पादन करुन फायदेशीर व्यवसाय करण्यासाठी तरुण यंत्रमागधारकांनी पुढे आले पाहीजे व त्यासाठी पॅावरलुम डेव्हलपमेंट कार्पोरेशन सहकार्यासाठी तयार असल्याचे सांगितले.सतिश कोष्टी यांनी विकेंद्रित यंत्रमाग व्यवसायाचे अनेक प्रश्न राज्य केंद्र शासनदरबारी प्रलंबीत आहेत मात्र त्यांना न्याय मिळत नाही यासाठी आणखी संघटीत प्रयत्नांची आवश्यकता असल्याचे नमुद केले.किरण तारळेकर यांनी आपल्या मनोगतामध्ये विकेंद्रीत यंत्रमाग व्यवसाय गेल्या पांच सहा वर्षापासुन कमालीचा अडचणीतुन जात असुन याचे मुळ ,केंद्राच्या कापुस व आयात निर्यात धोरणामध्ये असुन कापसाचा समावेश कमोडीटी मार्केटमधे झाल्यापासुन दररोजच्या तेजीमंदीमुळे कापुस व पर्यायाने सुत व कापडदरात अस्थिरता येत असल्याने खरेदीविक्रीचे दिर्घकालीन धोरण घेता येत नसल्याचे नमुद केले तसेच कापुस व्यापारातील शुन्य व्याजदराचे प्रचंड भांडवल असलेल्या बहुराष्ट्रीय भांडवलदार कंपण्याचा हस्तक्षेप,साठेबाजी व कृत्रीम टंचाई करण्यामुळे व्यवसाय अस्थिर झाल्याने नमुद केले तसेच जागतीकरणानंतर बांगला,श्रीलंका यासारख्या छोट्या देशांना मिळालेल्या शुन्य अबकारी कर योजनेचा चायनासारखे देश गैरफायदा घेऊन बांगला देशाच्या नावावर बेकायदेशीरपणे भारतात प्रचंड माल पाठवत असल्याने त्याचा प्रचंड मोठा तोटा देशातील वस्त्रोद्योगास होत असल्याचे नमुद केले.यावेळी अंकुशराव उकार्डे,उत्तमराव म्हेतर,नितीन गजानन दिवटे,कोल्हापुरचे राजेंद्र ढवळे ,सुरेश म्हेत्रे यांचे मनोगत झाले नियोजन व तांत्रिक सहाय्य कोष्टी परीषदेचे मिलिंद कांबळे व शितल सातपुते यांनी पाहिले. सुत्रसंचालन सेवामंडळाचे महासचिव रामचंद्र निमणकर सर यांनी केले .या परिषदेस पुणे येथुन पुणे कोष्टी समाजअध्यक्ष सुरेश तावरे,सुनिल ढगे,अशोक भुते,भगवानराव गोडसे,दत्तात्रय ढगे,इचलकरंजीचे कोष्टी समाज अध्यक्ष विश्वनाथराव मुसळे, पत्रकार दयानंद लिपारे,मनोज खेतमर,अरुण वडेकर,सौ सुधाताई ढवळे,सौ प्राक्तताई होगाडे विट्यातील वैभव म्हेत्रे,शिवाजीराव कलढोणे,विनोद तावरे,नितीन तारळेकर, उत्तमराव चोथे ,सचिन रसाळ,राजु भागवत यांसह अनेक यंत्रमागव्यावसायीक उपस्थित होते.यानंतर सर्वांच्या सहमतीने केंद्र व राज्य शासनास सादर करावयाच्या निवेदनाचा मसुदा तयार करण्यात आला व कार्यक्रम संपन्न झाला.
किरण तारळेकर विटा