*जलतरण पट्टू श्रावणी जाधव चा गौरव*
==============
कल्याण :– कल्याणची जलपरी महणुन ओळख असणारी आणि एलिफंटा ते गेटवे , देवबाग चा समुद्र हे अंतर पोहून पार करणारी आणि आता धरमतर ते गेटवे पार करण्यासाठी सज्ज झालेली जलतरण पट्टू श्रावणी जाधव हिला नुकताच जिल्हा जलतरण संघटनेचा नामांकित *जिल्हा गौरव पुरस्कार* मिळाल्याबद्दल काँग्रेस पक्षाचे राज्य सचिव ब्रीज दत्त, जिल्हा अध्यक्ष सचिन पोटे, प्रवीण साळवे कल्याण पश्चिम अध्यक्ष, लिवो मेकएनरॉय उपाध्यक्ष कल्याण जिल्हा व मुन्ना तिवारी यांच्या वतीने घरी जाऊन गौरव करण्यात आला. ब्रीज दत्त यांनी बोलताना सागितले की या पुढील सर्व स्पर्धा आणि मोहिमांसाठी श्रावणी ला सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल..
या सर्वाचे श्रावणी चे वडील भाऊ जाधव यांनी आभार मानले..