ब्रेकिंग
एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री बनवण्यासाठी कार्यकर्त्याने रक्ताने पत्र लिहिले…
अमित जाधव - संपादक

मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी सोहळा अगदी दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. मात्र मुख्यमंत्री कोण? याबाबत ठोस माहिती अद्यापही समोर आली नाही. त्यातच आता शिंदे गटाचे सेलू तालुकाप्रमुख पवन घुमरे यांनी थेट अमित शहांना रक्ताने पत्र लिहित एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करण्याची मागणी केली आहे. एकनाथ शिंदेंवर निसंकोचपणे मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपवून जनतेच्या मनातील इच्छा पूर्ण करा, असे पत्रात लिहिण्यात आले आहे.