बेधडक ठाणे न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

जोगेश्वरी विधानसभा समन्वयक पदी ॲड.भाई मिर्लेकर यांची नियुक्त……

अमित जाधव-संपादक

 

मुंबई-गणेश हिरवे

गेल्या १४ वर्श्यापासून जोगेश्वरी पूर्वेकडील भागात शिवसैनिक म्हणुन सक्रिय कार्यरत असलेले वृत्तपत्र लेखक ॲड. शिवराम उर्फ भाई मिर्लेकर यांच्या कार्याची दखल घेऊन स्थानिक आमदार व माजी राज्यमंत्री श्री रविंद्र वायकर व विभागप्रमुख , आमदार श्री सुनिल प्रभू यांच्या शिफारशीनुसार पक्षप्रमुख श्री उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून सामना दैनिकात नियुक्ती झाल्याचे नुकतेच प्रकाशित झाले.जोगेश्वरी विधानसभा क्षेत्रातील वॉर्ड क्र. ५२,५३,७३ व ७४ अश्या चार वार्डची जबाबदारी पक्षप्रमुख श्री उद्धवजी ठाकरे यांनी भाई मिर्लेकर यांच्यावर सोपवली आहे. त्यांच्या मृदुभाषी व सर्वांशी समजुतीने वागण्याच्या व सतत संपर्क साधून पक्षकार्य करण्याच्या शैलीमुळे ते संपूर्ण विधानसभा क्षेत्रात सर्व परिचित असे आहेत. विविध स्तरातील मान्यवरांकडून त्यांना शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्यांच्या नियुक्ती बरोबर रविंद्र साळवी विधानसभा समन्वयक , अनुरुद्र नारकर यांची व्यापार विभाग संघटक व राहुल देशपांडे यांची उपविभाग समन्वयक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे