*
समाजाचे प्रबोधन व्हावे या उद्देशाने बाळशास्त्री जांभेकर यांनी 6 जानेवारी वार शुक्रवार इस 1832 रोजी ‘दर्पण’ नावाचे मराठीतील पहिले वृत्तपत्र सुर केले, त्या दिवसाची आठवण म्हणून हा दिवस दिवस महाराष्ट्रात ‘मराठी पत्रकार दिन’ म्हणून साजरा केला जातो. हाच दिवस आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती दिवस म्हणून देखील साजरा केला जातो._*
समाजाचे प्रश्न, नागरीकांच्या समस्या, समता, व्यक्ती स्वातंत्र्य, अन्याय, अराजकता, अत्याचार, महागाई सारख्या अनेक नागरी प्रश्नांकडे प्रशासनाचे व लक्ष वेधण्यासाठी वृत्तपत्रांची भूमिका महत्वाची असते, म्हणून वृत्तसंपादकाला जागल्या देखील म्हणतात. चार दिवस नळांना पाणी आले नाही तरी तहानलेल्या नागरीकांचा प्रश्न मांडण्याची भूमीका वृत्तपत्र घेत असतात. माग अस्वच्छतेचा प्रश्न असो, रस्त्यांचा प्रश्न असो, तुंबलेल्या गटारी असोत, रस्त्यावरील पथदिवे असोत, एखादा मोर्चा असेल, संघटनेचे प्रश्न असतील, शासकीय कर्मचार्यांच्या मागण्या असतील, एखादे आंदोलन असेल, उपोषण असेल मग ती राजकीय पक्षाची असो, सामाजिक संघटना असो, डॉक्टर नर्स, आरोग्य सेवक असो किंवा ग्रामस्थ, शेतकरी असो अशा सर्वांचे प्रश्न अधिक प्रभावीपणे मांडून त्या प्रश्नांचे गांभिर्य शासनाच्या व प्रशासनाच्या लक्षात आणून देण्याची महत्वपणूर्ण भूमीका वृत्तपत्रे पार पाडतात, निवेदन, मोर्चा, उपोषण यातील गांभिर्य समजून घेवून त्याची चांगल्या पद्धतीने मांडणी करून त्या प्रश्नाचे गांभिर्य लक्षात यावे म्हणून त्या वृत्ताला फोटो लावून आकार देण्याचे, त्या बातमीला प्रभावी बनविण्याचे कार्य पत्रकार, वृत्तपत्र प्रतिनिधी, फोटोग्राफर, टायपिस्ट, संपादक करत असतात. प्रस्थापित राजकारणी, खासदार, आमदार, जिल्हा परिषद अध्यक्ष, जि.प.सदस्य, महापौर, नगरसेवक, पं.स.अध्यक्ष, सदस्य, दुध डेअरीचा अध्यक्ष, वि.का.सोसायटीचा चेअरमन, बाजारसमितीच अध्यक्ष, सरपंच, ग्रा.पं.सदस्य, ग्रामसेवक, शाळांचे मुख्याध्यापक, प्राचार्य, संघटनांचे अध्यक्ष, राजकीय संघटनांचे पदाधिकारी असे कितीतरी संस्थांचे लोकप्रतिनिधी आपल्या कामाच्या बातम्या वृत्तपत्रांना पाठवितात. त्याचसोबत जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपापिका, एसपी कार्यालय, पोलीस स्टेशन, जिल्हा रूग्णालय, सा.बां.विभाग, शेकडो प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, महाविद्यालय, क्रीडा मंडळ, मित्रमंडळ, शासकीय कार्यालय, रोटरी लायन्स क्लब सारख्या संस्था अशा कितीतरी सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, शासकीय संस्थांच्या बातम्या वर्तमान पत्राच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांपर्यंत पोहचत असतात.
वृत्त मिळविणे किंवा मिळालेल्या वृत्तावर संपादकीय संस्कार करणे आणि दुसर्या दिवशी सकाळीच देशातील, राज्यातील, जिल्ह्यातील, गावातील वाचकांच्या हाती ताजा अंक देणे ही सर्व जाबाबदारी आणि कसरत वृत्तपत्र यंत्रणेला करावी लागतात. शिवाय या देशात वृत्तपत्र हा एकमेव व्यवसाय असा आहे की, जो तोट्यात चालविला जातो. या व्यवसायात निर्मिती खर्चापेक्षा कमी किंमतीत म्हणजे अगदी 2-4 रूपयात वृत्तपत्र विकले जाते. अस म्हणतात की एक वृत्तपत्र काढणे म्हणजे एका बाळाला जन्म देण्यासारखे आहे. वृत्तपत्रात बातमी येेणे हे प्रत्येकाला आवडते. राजकीय मंडळी आपली बातमी कशी लागली, फोटो कोणता लावला हे आवर्जून बघतात. सामाजिक राजकीय कार्यकर्ते आपल्या बातम्यांची कात्रणे काढून ठेवतात. राजकीय क्षेत्रात एखादे पद मिळविण्यासाठी, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात पुरस्कार मिळविण्यासाठी, राजकीय पक्षाची उमेदवारी मिळविण्यासाठी आपल्या बातम्यांचे रेकॉर्ड तयार करून आपल्या वरिष्ठ नेत्यांना दाखवितात वृत्तपत्रांनी अनेक नेत्यांना मोठे केले आहे. त्यांना आमदार मंत्री पदापर्यंत पोहचवितात. वृत्तपत्रांच्या कात्रणांनी अनेक पुरस्कार मिळविणारे सामजिक कार्यकर्ते, शिक्षक शासनाचे पुरस्कार मिळवितात. वृत्तपत्रांच्या कचेरीत बातम्यांचे ट्रे भरलेले असायचे असा एक काळ होता. आता संगणकांवरील ई-मेल पूर्ण भरलेले असतात, आमची बातमी लागली नाही असे किमान 10 दूरध्वनी दररोज खणखणतात. परंतू ही वृत्तपत्रे कशी चालतात, त्यांना किती खर्च लागतो यावर कुणीही विचार करत नाही. आठवड्यातून एकदा साप्ताहिक काढायचे म्हणजे महिन्यातून चार अंक काढण्याचा खर्च किती यावर कुणीही भाष्य करीत नाही. एक रंगीत दैनिक वृत्तपत्र काढणे, त्याचे वितरण करणे याचा खर्च कुठून येतो यावर देखील कुणी विचार करत नाही. परंतू स्पर्धेच्या युगात एक वृत्तपत्र चालविणे आता परवडेनासे झाले आहे, काही लोकांचा समज असा आहे की, दूरदर्शनवर आम्हाला बातम्या मिळतात. समाजमाध्यमातून युट्यूब चॅनलवर बातम्या मिळतात, असे असले तरी या वृत्तातील सविस्तर घटना, सत्यता जाणून घेण्यासाठी वृत्तपत्रांचे महत्व कमी झालेले नाही. इलेक्ट्रानिक मिडिया तडक-भडक बेक्रींग न्यूज दाखवत असले तरी त्या घटनेचे वृत्त वाचल्याशिवाय वाचकांना समाजधान मिळत नाही. ही सर्व पार्श्वभूमी स्पष्टपणे मांडण्याचे कारण की, अलिकडच्या काळात बातम्या सर्वांना हव्या असतात मात्र वृत्रपत्रास जाहिराती देण्याची मानसिकता संपत चालली आहे. वृत्तपत्रे 12 महिने आपले वृत्त छापतात. मग त्यांना वर्षभरात जाहिराती देण्याची भूमीका समाजातून का घेतली जात नाही? समाजाची ही मानसिकता खरोखरच अन्यायपूर्ण आहे.
मंत्र्यांचा दौरा असतो, मोठे मोठे होल्डींग लागतात त्यावर लाखो रूपये खर्च होतात. परंतू वृत्तपत्रांना जाहिराती दिल्या जात नाही वाढदिवसाला शहरभर होल्डींग्स लागतात. परंतू जे वृत्तपत्र वर्षभर आपल्या बातम्या छापते मात्र त्याला जाहिरात दिली जात नाही. ही दळभद्री मानसिकता कशामुळे निर्माण झाली हा महत्वाचा प्रश्न आहे. वृत्तपत्राचा जाहीरात विभाग आपल्या वृत्तपत्राला जाहिराती मिळाव्यात म्हणून सातत्याने प्रयत्न करीत असतो. परंतू दसरा, दिवाळी, नववर्ष, वाढदिवस आणि वृत्तपत्राचा हक्काचा वर्धापन दिवस या जाहिराती देण्याचे सुद्धा मानसिकता संपत चालली आहे. वृत्तपत्र हवेववर किंवा पाण्यावर चालत नाही. ती समाजाच्या पैशातून, सहभागातूनच चाललात. त्यामुळे पत्रकार दिनाच्या, वृत्तपत्राच्या वर्धानदिनाच्या नुसत्या कोरड्या शुभेच्छा देवून चालणार नाही तर वृत्तपत्रासाठी आम्ही देण लागतो या भूमीकेतून त्यांना जाहिरातीच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य करण्याची महत्वपूर्ण भूमीका समाजाने पार पाडली पाहिजे. आज मराठी पत्रकार दिन आहे. शुभेच्छांच्या संदेशांनी मोबाईल ओसांडून वाहतील, परंतू या पत्रकार दिनी नागरीकांनी जाहिराती देवून का शुभेच्छा देवू नयेत? असे आमच्या समाजवादी मित्राला वाटते, त्यामुळे देण्याची भूमीका स्विकारण्याची तयारी वाढली पाहिजे, तरच वृत्तपत्रे चालतील. साने गुरूजींनी वर्गणी मागून आपले वृत्तपत्र चालविले. त्यामुळे समाजातील धुरीणांनी वृत्तपत्रांना सहकार्य करण्याची भूमीका स्विकारायला हवी. ज्या वृत्तपत्रांमुळे समाजात आपली ओळख निर्माण होते, सामाजिक राजकीय लाभ होतो त्या वृत्तपत्रांकडे दुर्लक्ष न करता त्यांना वर्षातून किमान दोन जाहिराती देण्याची भूमीका समाजातील घटकांनी स्विकारावी. शाळा, महाविद्यालयांना आपल्या बातम्या छापून याव्यात असे वाटते. आपल्या मुख्याध्यापक, प्राचार्य, पर्यवेक्षकांपर्यंतची नावे त्या बातमीत यावीत असे अपेक्षीत असते. परंतू 50 हजार ते अडीच लाख रूपयांपर्यंत वेतन घेणारे शिक्षक, प्राध्यापक, मुख्याध्यापक एक रूपयाची जाहिरात सुद्धा वर्तमान पत्रांना द्यायला तयार नसतात. मग त्यांनी बातम्या का पाठवाव्यात?अशा फुकट लोकांना प्रसिध्दी तरी का द्यायची.पत्रकार ला देखील पोट आहे त्याला देखील भूक लागते,संसार आहे या गोष्टी कडे कोणी लक्ष वेधून घेत नाहीत अशा फुकट प्रसिध्दीना यापुढे थारा न देणे हेच योग्य..