बेधडक ठाणे न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

दिवा शहराची नवी मुंबई महानगर पालिकेत समावेश करण्याची मागणी निव्वळ सवंग प्रसिद्धीसाठी -अँड.आदेश भगत ,पत्रात उल्लेख केलेल्या गावांचा मागणीशी काही संबंध नाही….

अमित जाधव - संपादक

दिवा शहराची नवी मुंबई महानगर पालिकेत समावेश करण्याची मागणी निव्वळ सवंग प्रसिद्धीसाठी -अँड.आदेश भगत
पत्रात उल्लेख केलेल्या गावांचा मागणीशी काही संबंध नाही

महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावादाचा प्रश्न पेटला असताना त्या विषयाला अनुसरून काही एक संबंध व मागणी नसताना दिवा ग्रामीण गावांची नवी मुंबई महापालिकेत समावेश करण्याची मागणी म्हणजे केवळ खमंग प्रसिद्धीसाठी केलेला खटाटोप असल्याचे बाळासाहेबांच्या शिवसेनेचे अँड.आदेश भगत यांनी म्हटले आहे.

जागा हो दिवेकर संस्थेचे विजय भोईर यांनी नुकतेच ठाणे महानगरपालिका आयुक्तांना पत्र देऊन दिवा ग्रामीण परिसरातील दातीवली, बेतवडे, साबे, आगासन, म्हातार्डी, देसाई,पडले, खिडकाळी, शीळ, खार्डी ही गावे नवी मुंबई महानगरपालिकेत समाविष्ट करावी अशी मागणी केली आहे. वास्तविक पाहता मागणीकर्ते विजय भोईर हे दिवा गावात वास्तव्यास असून दिवा शहरात एका राजकीय पक्षाचे सक्रिय पदाधिकारी आहेत. भोईर यांनी त्यांचा काही एक संबंध नसताना दिवा ग्रामीण परिसरातील दातीवली, बेतवडे, साबे, आगासन, म्हातार्डी, देसाई, पडले, खिडकाळी, शीळ, खार्डी ही गावे नवी मुंबई महानगरपालिकेत समाविष्ट करण्याची मागणी केल्यामुळे येथील गावकऱ्यांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला असल्याचे अँड.आदेश भगत यांनी सांगितले. मागणीकर्ते भोईर हे ज्या दिवा गावात राहतात त्या गावाचा आणि दिवा शहराचा मागणी केलेल्या पत्रात उल्लेख न केल्याने भोईर यांचा यामागे काही वेगळा हेतू आहे का? याचे स्पष्टीकरण भोईरांनी दिवा ग्रामीण परिसरातील गावकऱ्यांना दिले पाहिजे असे ॲड. आदेश भगत यांनी म्हटले आहे.

दिवा शहरात ठाणे महानगरपालिकेकडून अनेक विकास कामे झाली आहेत व मोठ्या प्रमाणात सुरू देखील आहेत. दिवा शहरात आरोग्य केंद्राचे काम मंजूर झाले असून लवकरच त्याचे काम सुरू होणार आहे. शिवाय दिवा शहरात पाच वंदनीय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाने सुरू असून त्यामध्ये मोफत औषध व तपासणी केली जात आहे. पिण्याच्या पाण्याच्या लाईन टाकण्याचं काम अंतिम टप्प्यात असून ते पूर्ण झाल्यावर ज्या काही ठिकाणी पाण्याची टंचाई आहे त्या विभागाला मुबलक पाणी मिळणार आहे. ह्या व इतर अनेक सुविधा दिवा शहराला मिळत असल्यामुळेच मागणीकर्ते विजय भोईर यांनी दिवा शहर वगळून दिवा ग्रामीण परिसरातील गावे नवी मुंबई महानगरपालिकेत समाविष्ट करावी अशी मागणी केल्याचे अँड. आदेश भगत यांनी म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे