ब्रेकिंग
स्टेट बँक ऑफ इंडिया अर्थात एसबीआयने आपल्या ग्राहकांना दिला इशारा,

स्टेट बँक ऑफ इंडिया अर्थात एसबीआयने आपल्या ग्राहकांना इशारा दिला आहे. याबाबत त्यांनी एक्सवर पोस्ट केली. “फसवणूक करणारे एसएमएस किंवा व्हॉट्सअॅपवर मेसेज पाठवून SBI रिवॉर्ड पॉइंट रिडीम करण्यास सांगत आहेत. एसबीआय असे संदेश, एसएमएस किंवा व्हॉट्सअॅप कधीही पाठवत नाही. कृपया अशा कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका आणि अज्ञात फाईल्स डाउनलोड करू नका”, असे बँकेकडून सांगण्यात आले.