ब्रेकिंग
‘उठा उठा दिवाळी आली मोती स्नानाची वेळ झाली’ जाहिरातीतील अलार्म काका यांच्या बद्दल माहिती नसलेल्या काही महत्वाच्या गोष्टी…
अमित जाधव-संपादक
एकदा चित्रपटाच्या शुटिंगवेळी आपले अलार्म काका म्हणजेच अभिनेते विद्याधर करमरकर आजारी पडले होते त्या अवस्थेतही विद्याधर करमरकर यांनी अगोदर आपले दिलेले काम पूर्ण करण्यावर अधिक भर दिला होता. गेल्या वर्षी दिवाळीच्या अगोदर म्हणजेच २० सप्टेंबर २०२१ रोजी वयाच्या ९६ व्या वर्षी विद्याधर करमरकर यांनी या जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनाने त्यांच्या अनेक चाहत्यांनी सोशल मीडियावर हळहळ व्यक्त केली होती. आता लवकरच दिवाळी साजरी केली जाणार आहे. त्यामुळे या अलार्म काकांना विसरून कसे चालणार? टीव्हीवर देखील आजही अलार्म काकांची ती जाहिरात कित्तेक जीवसापासून पाहायला मिळत आहे आणि यापुढे देखील ती जाहिरात अनेक वर्ष दिवाळीत तरी नक्कीच पाहायला मिळेल अशी आहे. किमान या माध्यमातून तरी अभिनेते विद्याधर करमरकर काका प्रेक्षकांच्या स्मरणात राहोत एवढीच अपेक्षा…