शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष*/ *डॉ श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांचा ५ वा वर्धापन दिन संपन्न, ज्येष्ठ पत्रकार रणवीर राजपूत यांना मुख्यमंत्र्यांचा हस्ते सन्मानित…
अमित जाधव - संपादक
*शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष*/ *डॉ श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांचा ५ वा वर्धापन दिन संपन्न*
मुंबई,दि.१:- हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने सुरू झालेल्या शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष अन् डॉ श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांचा ५ वा वर्धापन दिन मुख्यमंत्री श्री.एकनाथजी शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईच्या यशवंतराव चव्हाण सेंटर येथे मोठ्या थाटामाटात संपन्न झाला.
या कार्यक्रमास केंद्रीय मंत्री श्री.रामदासजी आठवले, मंत्रिमंडळातील सन्माननीय सदस्य,कल्याणचे खासदार सर्वश्री. डॉ.श्रीकांत शिंदे,धैर्यशील माने,आमदार सर्वश्री शहाजीबापू पाटील, प्रताप सरनाईक, श्री.जयकुमार रावल,सौ.यामिनी जाधव आणि राज्यातील ख्यातनाम दूरचित्रवाहिन्यांचे प्रमुख,वैद्यकीय व सामाजिक सेवेतील मान्यवर,
मुख्यमंत्र्यांचे ओ.एस.डी.श्री.मंगेश चिवटे यांचे कुटुंबीय तथा राज्यातील हजारो
रुग्णसेवक,डॉक्टर्स अन् अन्य पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रारंभी मा.चिवटेसरांनी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या आरोग्य सेवेतल्या गेल्या पाच वर्षांच्या प्रगतीचा आढावा घेतला.
याप्रसंगी मुख्यमंत्री श्री.एकनाथजी शिंदे यांनी राज्यातील २७ जिल्ह्यांमध्ये रुग्णसेवकांनी केलेल्या गोरगरिबांच्या रुग्णसेवेची मुक्तकंठाने प्रशंसा करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.त्याप्रमाणेच फाउंडेशनचे प्रमुख खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनीही राज्यात सुरु असलेल्या आरोग्य महायज्ञाच्या यशाचे श्रेय कक्ष प्रमुख मंगेश चिवटे अन् त्यांच्या वैद्यकीय टीमला दिले.
मंत्रिमंडळातील सन्माननीय सदस्य सर्वश्री गुलाबराव पाटील,मंगलप्रसाद लोढा,उदय सामंत,दीपक केसरकर,अब्दुल सत्तार,अतुल सावे,शंभूराजे देसाई यांनीही कक्ष प्रमुख मंगेश चिवटे अन् त्यांच्या कृतिशील टीमच्या रुग्णसेवेची प्रशंसा करून अभिनंदन केले.
याशिवाय
दूरचित्रवाहिन्यांचे राजीव खांडेकर,प्रसन्न जोशी,विलास बढे,निलेश खरे आदी ज्येष्ठ पत्रकारांनी मंगेश चिवटे अन् त्यांच्या कर्तव्यदक्ष टीमची तोंड भरून स्तुती करत त्यांना पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
दरम्यान आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या डॉक्टर्स व त्यांचे हॉस्पिटल्स,रुग्णसेवक तथा मदत कक्षाचे प्रसिद्धीचे काम करणारे ज्येष्ठ पत्रकार,मंत्रालयातील निवृत्त प्रसिद्धी अधिकारी
रणवीरसिंह राजपूत या सर्व सत्कारमूर्तींचा *सन्मानचिन्ह व मा.मुख्यमंत्र्यांचे कृतज्ञता पत्र* देऊन याप्रसंगी गौरव करण्यात आला.
शेवटी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे ब्रँड ॲम्बेसेडर आमदार श्री.शहाजीबापू पाटील यांनी उपस्थित मान्यवरांचे तथा
रुग्णसेवकांचे मनपूर्वक आभार मानले.