बेधडक ठाणे न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

अभ्युदय बँक व सिद्धांत पार्क हौ. सोसायटी आयोजित चित्रकला स्पर्धा उत्साहात…

अमित जाधव - संपादक

अभ्युदय बँक व सिद्धांत पार्क हौ. सोसायटी आयोजित चित्रकला स्पर्धा उत्साहात.

ठाणे, दिवा ता 1 फेब्रु : अभ्युदय को. ऑप. बँक दिवा शाखा व सिद्धांत पार्क को ऑप. हौ. सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली. चित्रकला स्पर्धेस सहभागी झालेल्या सर्व लहान मुलांना चित्रकलेचे पेपर, रंगीत खडू व खाऊचे वाटप करण्यात आले. तसेच स्पर्धेत सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. चित्रकला स्पर्धेत एकूण 60 मुलांनी सहभाग घेतला होता.
स्पर्धेतील लहान मुलांच्या गटातील 3 सर्वोत्तम स्पर्धक निवडण्यात आले.त्यातील प्रथम विजेता कु.रिहान राकेश पाटिल,द्वितीय क्रमांक हंसी राहुल पाटिल तसेच तृतीय क्रमांक हर्षिता उमेश प्रजापती अशा अनुक्रमे 3 विजेत्यांना मेडल (पदक) मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. तसेच मोठया मुलांच्या गटातील तीन विजेते निवडण्यात आले. त्यातील प्रथम विजेता कु. स्पर्श जयेश लबदे द्वितीय क्रमांक कु.किया स्वरुप समंता व तृतीय क्रमांक कु.रिम्शा मुनेश साळवी या तीन मोठया मुलांच्या गटातील विजेत्यांना दिवा शाखेचे सहव्यवस्थापक श्री. रविंद्र विठ्ठल धूरी व सिद्धांत पार्क सोसायटीचे श्री.विकास भगत यांच्या हस्ते आकर्षक ट्रॉफी देण्यात आली. या कार्यक्रमाला लहान मुलांचे पालक, तसेच आजूबाजूच्या सोसायटीतील रहिवाशी मोठया संख्येने उपस्थित होते.तसेच स्पर्धेत सहभागी सर्व स्पर्धकांना अभ्युदय बँकेमार्फत प्रमाणपत्र देण्यात आले.

बक्षीस वितरण समारंभानंतर स्पर्धेत भाग घेतलेल्या मुलांना आपल्या अनुभवाचे योग्य ते मोलाचे मार्गदर्शन मान्यवरांकडून करण्यात आले.कार्यक्रमाची सांगता लहान मुलांनी राष्ट्रगीत गाऊन पुर्ण केली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अभ्युदय बँकेतर्फे अधिकारी रविंद्र विट्ठल धूरी, विनोद धूरत,वैशाली देवेंद्र पाटिल,प्रविण भोईर,सुधाकर रोहकले,हेमंत वेखंडे,प्रदिप बांगर,नितिन चौधरी,अविनाश इसामे,जयदीप पवार,राजेश भोंडीवले,वैशाली पाटिल,अनिल साईल,छगन रसाळ आदी कर्मचा-यानी विशेष मेहनत घेतली…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे