बेधडक ठाणे न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

कालीचरण बाबा ठाणे पोलिसांच्या ताब्यात….

अमित जाधव-संपादक

ठाणे ;  : छत्तीसगडमधील धर्मसंसदेत अभिजित सरग उर्फ कालीचरण बाबाने महात्मा गांधींजी बाबत संतापजनक वक्तव्य केल्याने नवा वाद निर्माण झाला होता. या वादाचे पडसाद ठाण्यात देखील उमटले होते. मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी नौपाडा पोलिसात या बाबाविरोधात २९ डिसेंबर २०२१ रोजी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर नौपाडा पोलिसांनी भादवी गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यात अभिजित सरग उर्फ कालीचरण बाबाला नौपाडा पोलिसांनी रायपूर येथील मध्यवर्ती तुरुंगातून ताब्यात घेतले आहे. गुरुवारी सायंकाळपर्यंत कालीचरण बाबाला घेऊन पोलीस पथक ठाण्यात पोहचेल अशी माहिती नौपाडा पोलिसांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे