दिव्यातील डंपिंग विरोधात निवडणुकांच्या तोंडावर आंदोलनाचा मुद्दा संपेल ,म्हणून विरोधक कुरापती काढण्यात व्यस्त……माजी उप महापौर व नगरसेवक रमाकांत मढवी
अमित जाधव -संपादक
- दिव्यातील डंपिंग विरोधात निवडणुकांच्या तोंडावर आंदोलनाचा मुद्दा संपेल ,म्हणून विरोधक कुरापती काढण्यात व्यस्त……
ठाणे- दिवा-शिवसेनेचे दिव्यातील नगरसेवक व माझी महापौर मा. रमाकांत मढवी यांनी विरोधकाना डंपिंग प्रश्नी दिले खणखणीत उत्तर दिले आहे
ठाणे महापालिकेला हद्दीतील दिव्यातील डम्पिंग बंद करण्यासाठी दिव्यातील जनतेला शिवसेनेने जे वचन दिले होते त्या नुसारच आम्ही दिव्यातील डंपिंग डोगरांच्या पायथ्याशी हलवले व कचऱ्याची विल्हेवाट योग्य रित्या होईल या नुसार आम्ही दिव्यातील डंपिंग बंद केले असे नागरसेवक मढवी साहेबानी स्पष्ट केलं.
निवडणुकीच्या तोंडावर विरोधकांना आंदोलचा मुद्दा संपेल म्हणून त्यांची पायाखालची जमीन घसरली आहे म्हणून विरोधकांनी गावातील लोकांना भडकवण्याचे काम केलीत व कचऱ्याच्या माध्यमातून निवडणुका जवळ येताच राजकारण करीत आहे अशा भूलथापांना सर्वसामान्य दिवेकर नागरिक बळी पडणार नाही त्यांना मी शिवसेनेच्या माध्यमातून आव्हाहन करतो आपल्या साठी शिवसेनेचे नेते सक्षम आहेत आणि शिवसेना ही दिवेकराणा बांधील आहे ती बांधील की आम्ही पूर्ण करू जर इतर राजकीय विरोधक कोणी डंपिंग हटवण्याचा आड येत असेल तर त्यांना शिवसेना च्या पद्धतीने उत्तर दिले जाईल भांडार्ली गावातील लोक देखील आपलीच आहेत त्यांच्या देखील भावना लक्षात घेऊन त्यांच्या देखील शिवसेना पाठीशी आहे असे खुद्दमढवी साहेबांनी सांगितले.