दिव्यात शिवसेना शाखाप्रमुख सुनील कांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त आर एन नगर येथे भव्य रोजगार मेळावा संपन्न, मा.नगरसेवक शैलेश पाटील यांची विशेष उपस्थिती..
अमित जाधव - संपादक
ठाणे, दिवा : लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून दि. १५ ऑगस्ट २०२४ रोजी दिवा पश्चिम येथील एन आर नगर मध्ये भव्य रोजगार मेळावा पार पडला.शिवसेना दिवा उपशहर प्रमुख तथा मा. नगरसेवक शैलेश मनोहर पाटील यांनी शिवसेना शाखाप्रमुख सुनील कांबळे यांच्या वाढदिवसा निमित्त या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
सदर रोजगार मेळाव्यात ठाणे, मुंबई, नवी मुंबईसह भिवंडी येथील विविध क्षेत्रातील सुमारे हजारो पेक्षा जास्त उमेदवारांनी लाभ घेतला.रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. सदर रोजगार मेळाव्यासाठी अनेक नामांकित कंपन्यांनी सहभाग घेतला होता.त्यामुळे युवक युवतींना नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे.शिवसेना दिवा उपशहर प्रमुख शैलेश पाटील याच्या पुढाकाराने या रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. सदर उपक्रमामामुळे स्थानिक युवकांना त्यांच्या कौशल्यानुसार गरजू युवक-युवतीना तात्काळ नोकरीची संधी मिळाली.
यावेळी दिवा शिवसेनेचे शेकडो पदाधिकारी व महीला वर्ग उपस्थित होता.