बेधडक ठाणे न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

दिवा शहरातील अनधिकृत बांधकामांवर महापालिकेची धडक कारवाई….

अमित जाधव-संपादक

*⭕️दिवा शहरातील अनधिकृत बांधकामांवर महापालिकेची धडक कारवाई.*

ठाणे (3 फेब्रु, संतोष पडवळ ): ठाणे महापालिकेच्यावतीने अनधिकृत बांधकामांवर कारवाईची धडक मोहिम सुरुच असून आज दिवा परिसरातील प्रभाग क्र. २७, २८, २९ व ३३ मधील खान कंपाऊंड, दिवा शीळ रोड व दिवा आगासन येथील अनधिकृत बांधकामांवर निष्कासनाची कारवाई करण्यात आली. सदरची कारवाई ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या आदेशांन्वये करण्यात आली.

या कारवाईत समीर शेख यांचे प्लिंथ अंदाजे २००० चौ.फुट बांधकाम, शिबली नगर येथील अब्दुल गणी शेख यांचे प्लिंथचे अंदाजे ४५०० चौ.फुटाचे अनधिकृत बांधकाम, अन्सारी रईस, आचार गल्ली यांचे २८०० चौ.फूट चे पहिल्या मजल्यावरील बांधकाम तर निसार खान यांचे २८०० चौ. फूट पहिल्या व दुसऱ्या माळ्यावरील बांधकाम व तीन स्लॅब गॅस कटरने कट करून निष्कासित करण्यात आले. तसेच हमीद भाई, आचार गल्ली यांची 3500चौरस फूट प्लिंथ व कॉलम, शहनवाज शेख, मन्नत बंगल्या मागे यांच्या २००० चौ.फूट तिसऱ्या माळ्यावरील कॉलमचे बांधकाम निष्कासित करण्यात आले.

तसेच विक्रांत पाटील यांचे अंदाजे ३५०० चौ.फुट मोजमापाचे प्लिंथ, सुनील पाटील यांचे श्री समर्थ नगर दिवा येथील तळअधिक ६ व्या मजल्यामधील ४, ५, व ६ मजला निष्कासीत करण्यात आला. सुनिल म्हस्के यांचे अंदाजे ४००० चौ.फुट मोजमापाचे तळ अधिक १ दुसऱ्या मजल्यावरील कॉलम व स्लॅब निष्कासीत करण्यात आले. सुनिल कनोजिया यांचे मढवी कॉम्पलेक्स् जीवदानी नगर येथील तळअधिक २ तिसऱ्या मजल्यावरील अंदाजे ३००० चौ.फुट मोजमापाचे कॉलम व स्लॅब, नरेश भोईर यांचे जिवदानी नगर येथील तळअधिक १ मजल्यावरील कॉलम आणि हेमंत मांढरे यांचे दिवा दातिवली रोड येथील अंदाजे ४००० चौ. फुट मोजमापाचे प्लिंथ निष्कासित करण्यात आले.

सदर कारवाई १ पोकलेन, ३ गॅसकटर, १ ट्रेलर, ८० कामगार, १३ पोलीस, ६ जीप, ३ जेसीबी व ४ टेम्पो आदी यंत्रसामुग्री व कामगारांच्या साहाय्याने करण्यात आली.

सदरची कारवाई अतिक्रमण विभागाचे उपआयुक्त अशोक बुरपल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून सदर कारवाई दरम्यान दिवा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्त अलका खैरे, मुंब्रा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त सागर साळुंखे, कळवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त समीर जाधव व अतिक्रमण विभागाचे सहाय्यक आयुक्त फारुख शेख व अतिक्रमण विभागाकडील अधिकारी व कर्मचारी व पोलीस विभागाकडील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे